गुरुवार, 25 अक्टूबर 2012

पृथिव्यैः समुद्रपर्यन्ताया एकराळिती September 5, 2012


पृथिव्यैः समुद्रपर्यन्ताया एकराळिती -- या मंत्रातील एकराळ किंवा एकराट् म्हणजेच एक राष्ट्र ही संकल्पना भारतात किती युगांपासून चालत आली आहे. पण आज याच भारतीय समाजाची मने भौगोलिक वादावरून दुभंगत आहेत. शत्रू चहुदिशेने घेरत आहेत, आर्थिक, भौगोलिक व जातीय लढाया लढण्यासाठी -- निर्णायक लढायांसाठी -- आणि आपण राजपूत राजांची एकमेकांशी वैर कायम राखण्याची जुनी परंपराच चालवणार आहोत का। राजांनो, रात्र वै-याची आहे -- जागे व्हा, जागे रहा ।


  • Pradnya Samant have said this mantra so many times without knowing the meaning as I dont know sanskrit....your status has inspired me to understand the whole text...Thanks
  • Milind Kotwal लीनाजी, आपल्याकडे निरनिराळ्या संकल्पना मुळे सार्वत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे आणि कोणीही या मुद्द्या कडे शास्त्री दृष्टीकोनातून पहाण्यास तयार नाही ... त्याला फक्त भावनिक मुद्दा करणे सुरु आहे ...हे प्रगतीशिलतेचे लक्षण नाही ... यासंदर्भात खालील प्रश्नांवर विचार होणे जरुरी आहे ...

    १. राष्ट्रीयत्व म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती आहेत? आणि त्याचा समाजावर काय प्रभाव असतो?
    २. राष्ट्रीयात्वा आणि प्रांतिक ओळख यात काय फरक आहे ? 
    ३. राष्ट्रीयात्वा , प्रान्तियात्वा आणि शासनाचे अधिकार यांचा काय संबंध आहे ? राष्ट्रीयत्व नेतृत्व आणि प्रांतीय नेतृत्व यात काय संबंध असावे ?

    हे संबंध नीट समजून घेतल्याशिवाय फक्त भावनिक रीत्या कोणतेही मत हे येथील समाजाला अंधाराच्या गर्तेत लोटू शकेल ...
  • Shahidakhtar Sayyad " मैडम..आपल्या मौल्यवान विचार सरनिशी मनःपूर्वक सहमत आहे. खरे तर प्रत्येक देश बांधवानी या घडीस आपल्या संस्कृतीची जान ठेऊन ' एक राष्ट्र' या विचार धारेत एक रूप होऊन प्रामाणिकपणे समाविष्ट झालेच पाहिजे .....!!! "


    People Who Shared This


कोई टिप्पणी नहीं: