मंगलवार, 23 अक्तूबर 2012

शिक्षणांत गरीब-श्रीमंत भेदाभेद September 1, 2010


शिक्षणांत गरीब-श्रीमंत हा भेदाभेद
 Leena Mehendale on Wednesday, September 1, 2010 

श्री चाफेकरांचा मुद्दा महत्वाचा आहे, पण बरोबर नाही. मराठी शाळांचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर त्यांत लक्ष घाला, पण शाळा बंद पाडणे हे उत्तर नाही. इंग्लिश शाळांची क्वालिटी म्हणे खूप चांगली असते, पण त्या गरीब-श्रीमंत हा भेदाभेद वाढवणारेच शिक्षण देतात ना, तर मग क्वालिटी चांगली कशी ? सर्व मराठी शाळा गरीब मुलांसाठी नसतील मात्र इंग्लिश शाळा श्रीमंतांसाठीच आहेत. व त्यांच्याकडे गरीब मुलांना नाकारून कळत-नकळत त्या गरीबांना हीन लेखण्याचेच शिक्षण देतात . शिवाय आपली लोकशाही असूनही फ्रीडम ऑफ चॉइसला कांहीच महत्व नाही कां ? जिथे संविधानाच्या तरतूदीने नराठीचे संरक्षण व संवर्द्धन करायला हवे ते सोडून गळचेपीचा प्रयत्न शासनाने कां करावा ? कुणाच्या हितसंबंधासाठी हे होत आहे ?

  • Jayesh Pathak लहान तोंडी मोठा घास होतोय .
    पण हें जे चाललेय यात आपलेच ओठ आणि आपलेच दात आहेत,होय ना ?
    मी एका मराठी शाळेचा विश्वस्त आहे.८६० विद्यार्थी संख्या असलेली धर्मदाय न्यासाची ती शाळा आहे.
    विद्यार्थी संख्या,अनुषंगिक त्रेराशिकानुसार बिंदू नामावली तयार करून,शिक्षका
    ...See More
  • Leena Mehendale मग तुम्ही या शाळेत काही नवे उपक्रम करू शकता का
  • Prafulla Pathak well. unfortunately what mentioned by Jayesh is TRUE story. but still there are people who do not 'expect'. and u need to be lucky enough to come across them.
  • Shashank Kono लीना मॅडम 
    तुमचे म्हणणे बरोबर आहे. हा प्रकार सर्रास घडतो आहे. पण काही अपवादही आहेत. इथे बेळगांवला एक मुलींची प्रसिध्द इंग्रजी शाळा आहे. तिथे फक्त हुशार मुलींनाच प्रवेश मिळतो मग ती गरीब असली तर तिची जबाबदारी शाळा घेते . सुखवस्तु पालकांना एका गरीब मुलीची जबाबदारी दिली जाते. पुढील वर्षी माझ्या मुलीच्या प्रवेशावेळी मी पण एका गरीब मुलीची जबाबदारी स्विकारेन.
  • Leena Mehendale congrates to them
  • Jayesh Pathak पु. लीनाजी ,
    होय उपक्रम सुरु करता येतील.
    आपण मार्गदर्शन करावे अशी विनंती.
    सध्या गायत्री चालीसा,रामरक्षा,अथर्वशीर्ष,संस्कृत पाठांतर यांना बक्षिसे ठेवली आहेत.
    विशेष म्हणजे,भगवद्गीता या थीम वरील चित्रकला स्पर्धेत दावूदी बोहरा समजाच्या मुलीने बाजी मारली.
    ...See More
  • Sagar Godambe I am writing something out of topic, but related to the comment mentioned above. How fare is it to differentiate between scholar and average students. Most of the students in given school are of almost equal intelligence and it's teacher's responsibili...See More
  • Leena Mehendale जयेश आम्ही एक संस्कृत अंत्याक्षरी सुरू केली आहे. ही मुलं भाग घेऊ शकतात का पहा.
  • Leena Mehendale do u have computers there?
  • Leena Mehendale sagar, I agree, a teacher may not be allowed to diifferentiate. All children have a right on good education.
    But we are giving that right to only the rich today.
  • Jayesh Pathak अंत्याक्षरी एवढ्या तयारीचे नाहीत,मात्र जे पहिले २ विद्यार्थी अथक ३५-४० मिनिटे पाठांतर सुश्राव्य ऐकवू शकतात.त्यांच्यावर इतर ताण पण असल्याने,नाही करू शकलो तेवढे साध्य.शिवतांडव स्तोत्र तर मी तबल्यावर संगत करून पेश केले होते २६ जानेवारी ला,दाद मिळाली
    .
  • Leena Mehendale ती अतिशय सोप्या नियमावलीची आहे. लिंक पाहिल्यास लक्षांत येईल.

कोई टिप्पणी नहीं: