बुधवार, 5 सितंबर 2012

शिवबांच्या राज्यांत


शिवबांच्या राज्यांत
शिवबांचे नांव जपत
शिवबांचा वारसा सांगत
दारु गाळतात कुणी कुणी
अन्नाची नासाडी करून
गरीबाचा घास पळवून
अन् हाकारतात कोवळ्या कळ्यांना --
या बाळांनो या
फुकट पाजतो दारु ती प्या
बेधुंद होऊन नाचा
बिघडा बाळांनो बिघडा
उद्याचे आहांत तुम्ही मतदार
आमच्या राजभोगाचे
मावळ्यांनी नाही का आपली निष्ठा महाराजांच्या पदरांत टाकली
तुम्ही पण टाकाल तुमची मते आमच्याच पदरांत
खात्री आहे आम्हाला
रायरेश्वराच्या चरणी स्वराज्य-स्थापनेची शपथ घेणा-या शिवबांची शपथ
आमच्या राजसत्तेत तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही
अशा मद्यधुंद पार्ट्या
बिघडा बाळांनो बिघडा
तुमच्या बिघडण्यांतच दिसतो आम्हाला आमचा सुवर्णकाळ — with Jyoti Vasagadekar Manohar, Jayprakash Manas, शेतकरी मासीक and 32 others.


रेव्ह पार्टी, चिल्लर पार्टी, पब संस्कृती = नव्या पुण्याचा नवा चेहरा --SAYS SAMANA 
शांत, सांस्कृतिक, सुसंस्कृत, विद्येचे माहेरघर अशी अनेकविध बिरुदे मिरविणारे पुणे. त्या पुण्याच्या सांस्कृतिक प्रतिमेला तडा देणार्‍या घटनांची भर पडत आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राभिमानाचे प्रतीक असलेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टी झाल्याचे उघड झाले होते आणि पुण्याची सांस्कृतिक पगडी डळमळली होती. आता तर ‘चिल्लर पार्टी’च्या नावाखाली भावी पिढी व्यसनाधीन करण्याचा धंदेवाईक प्रकार पुण्यातच झाला. मुंढवा भागातील नदीपात्राला लागून असलेल्या ‘रिव्हर व्ह्यू’ या आलीशान हॉटेलात स्वीमिंग पूलमध्ये चारशे मुलगे-मुली नाचगाणी आणि मद्यपानात धुंद होते. पोलिसांनी धाड टाकून आयोजकांना पकडले आणि त्या पोरांनाही घराकडे पिटाळले. जेमतेम इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणार्‍या या मुलांची भरदुपारी अशी रंगात आलेली पार्टी पाहून पोलीसही हादरले. पालकांनी केलेल्या तक्रारवजा विनवणीमुळेच पोलिसांनी ही कारवाई केली आणि ‘नव्या पुण्या’चा असाही एक पर्दाफाश झाला. चिल्लर पार्टीमध्ये मुलांना चारशे रुपये प्रवेश फी, तर मुलींना प्रवेश मोफत! तसेच ‘ब्लॅडर फुल’ नावाखाली हवी तितकी दारू दिली जात होती. या पार्टीत नवश्रीमंत, उच्च-मध्यमवर्ग, मध्यमवर्ग अशा सगळ्याच स्तरांतील मुले होती. आई-वडिलांचा विरोध न जुमानता ती चिल्लर पार्टीला गेली. त्यामुळे हतबल पालकांनी अखेर पोलिसांची मदत घेतली. अर्थात काही तथाकथित बड्या पालकांनी पोलिसांचीच हजेरी घेतली. षोडश वयात असलेली मस्ती, सारासार विचार न करण्याकडे असलेला कल अशा गोष्टींमुळे या वयोगटातील पिढी अनेकदा भलत्याच उन्मादात फसते. पुण्यातील हॉटेलातही तेच घडले. पोलिसांनी एक चिल्लर पार्टी रोखली असली तरी अशा ‘चिल्लर पार्ट्या’ पुण्यात पुढे होणारच नाहीत याची काय खात्री? त्या कायमच्या कशा रोखता येतील हाच आता खरा प्रश्‍न आहे. मध्यमवर्गीय पालकांनीदेखील त्यांची लाइफस्टाइल अर्थात जीवनशैली तपासून पाहण्याची वेळ आली आहे. भावी पिढीने जबाबदारपणे वागण्यासाठी आधीच्या पिढीनेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवावयास हवे. रेव्ह पार्टी, चिल्लर पार्टी, पब संस्कृती हाच नव्या पुण्याचा नवा चेहरा होणार आहे का?


Tejlaxmi Dhananjay Dhopaokar, Mukesh Somaiya and 33 others like this.


Leena Mehendale खरे तर पार्टीच्या वेळी ह़ॉटेलात असणारे मॅनेजर, वेटर्स, आणि ह़ॉटेल-मालक सर्वांवर गुन्हा दाखल होउ शकतो, क्रिमिनल कॉन्सपिरसी व जुव्हेनाईल अँक्ट खाली, पण पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखलच केलेला नाही, असे चित्र दिसते. कुणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.
September 1 at 10:20pm · Like

Rajeev Hardikar · 8 mutual friends
madam apan sangave yapeksha jast kiti dnad hou shakto te.Kara apanhi EX IAS officer ahat
September 2 at 7:56pm · Like

Leena Mehendale बिघडा बाळांनो बिघडा आणि माझ्या मद्याचा खप वाढवा असेच जणू दारु गाळणारे पुढारी सांगत आहेत -- लोकमत मधील सविस्तर वृत्तानुसार अल्पवयीन मुलांच्या रेव्ह पार्ट्या दर आठवड्याला होतात --- मुंढवा रोड येथील हॉटेल रिव्हर व्हू येथे मुलांसाठी शनिवारी दुपारी पार्टी आयोजित केली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने पार्टी आयोजित करणार्‍या दर्शिल चव्हाण (१९) आणि आशिष लिमये या दोघांवर खटले दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना प्रत्येकी १२00 रुपये व इतर सहा मुलांना प्रत्येकी ७00 रुपये दंड आकारला.

पुण्यात झालेली ‘चिल्लर पार्टी’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू जयंत पवार यांच्या मालकीच्या रिव्हर व्हू हॉटेलमध्ये झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण तीन दिवस दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे. दारू पुरविणार्‍या हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसांनी अद्याप कारवाईही केलेली नाही. धूम्रपान आणि विनापरवाना दारू विक्रीसारखी किरकोळ कलमे लावली. खटले अशाप्रकारे दाखल केले, की न्यायालयाने केवळ दंड करून सोडून दिले. त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. त्यांना बालन्यायालयात हजर करणेही आवश्यक होते. मात्र, कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन अल्पवयीन असल्याचे दाखवून केवळ काही मुलांना पालकांच्या स्वाधीन करून पोलिसांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा या पार्टीची व्हिडीओ क्लिप बाहेर आली, तेव्हा या धक्कादायक प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. अशा पाटर्य़ांवर ‘रेव्ह पार्टी’ म्हणून कडक कारवाई करणार्‍या पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी या वेळी केवळ खटले दाखल केले.

व्यसनाधिन मुलांसमोर हतबल झालेल्या पालकांनाच अखेर पोलिसांत तक्रार करावी लागली.आपली मुले दर आठ दिवसांनी कुठल्या तरी पार्टीला जातात. दारू पिऊन येत असून आमचे ऐकतही नसल्याची हतबलता व्यक्त केली.