बुधवार, 24 अक्तूबर 2012

प्रसन्न अभ्यास July 27, 2012

Leena Mehendale July 27
माझी एक आठवण -- एकदा एका अपरिचितांकडे बसले होते. तिथे एक आजोबा पण बसलेले होते- निवृत्त शिक्षक. बोलतांना मी सहज बोलून गेले --मी घरी मुलांचा अभ्यास घेते -- त्यामुळे त्यांचा शिकवणीला जाण्याचा वेळ वाचतो. आजोबांनी रोखून पहात विचारले -- अभ्यास या शब्दाची नेमकी व्याख्या काय. मी थोडी दचकले पण विचारपूर्वक उत्तरले कि जो दररोज (किंवा सातत्याने), नियमपूर्वक केला जातो तो अभ्यास. ते म्हणाले -- अपुरी आहे -- त्या
ंत महत्वाचे लक्षण राहून गेले आहे -- जो दररोज (किंवा सातत्याने), नियमपूर्वक व आनंदपूर्वक केला जातो तो अभ्यास -- आनंद नसेल तर अभ्यास मनावर ठसणार नाही व निरुपयोगी होईल. घरी येऊन मुलांना ही नवी व्याख्या शिकवली व तेंव्हापासून आम्ही सवय लाऊन घेतली कि शिकताना आपल्याला आनंद होतोय ना हे जाणीवपूर्वक तपासायचे ( व नसेल तर थांबायचे)
295094Like ·  · 

  • Sunil Pathak Madam I have been observing you with curiosity and awe . I honour and respect you too. I have always thought that you had a successful career as an administrator but you could be even better as a teacher and professor
  • Shahidakhtar Sayyad " लीनाजी..खरेच आहे...मी हे स्तोत्र माझ्या मुलांवर अवलंबले आहे, तेव्हांच.. माझा मुलगा उच्च शिक्षित झाला(Phd.In Nano Technology.usa.आणि Intel मध्ये कार्यरत आहे) एवढेच काय....कालच माझ्या मुलीला( मास्टर्स साठी अमेरिकेला) देखील मुंबईला विमान तळावर निरोप देऊन काही तासा पूर्वी कराडला पोहोचलो आहे.मुलगी मुबई विद्यापीठ/ इंजिनियर.विशेष प्राविण्यासह..आता माझी दोन्ही मुले, सून एकाच ठिकाणी असतील आणि पुढे भारतात परतून शिक्षण/संशोधन यात कार्यरत राहतील........ बोलायचे तात्पर्य हेच कि .....आजोबांचे विचार प्रत्यक्षात अगदी खरे आहेत.... (सर्वाना प्रेरणा मिळावी हाच एकमेव उद्देश) धन्यवाद .....!!! "
  • Jayant Jawadekar we must act sincerely to make our education system in this way.most f the time we earn that is least interested fr us.this defeats the purpose of education
  • Pratibha Chaudhari नियमपूर्वक व आनंदपूर्वक .....yes really true...do everything by heart...whatever it may be...
  • Rakhee's Ceraprints Aatya me pan Nealla hech sangat aaste :)
  • Leena Mehendale Anand Deogade Haribhau Niturkar -- आपण दोघे हैद्राबादला रहाता तर नर दिलेल्या लिंकमधे जे गाणं आहे त्याच एक कडवं तेलगूमधे आदे. मला त्याचे एक्झॅट शब्द देवनागरीत लिहुन देऊ शकाल का?
  • Meeran Borwankar enjoyed reading it. So very true.
  • Leena Mehendale Meeran Borwankar --Was Thinking about you while writing because u have always been asking me to pen such stories.
  • Rationalist Rajendra Gadgil यात अभ्यास म्हणजे काय हे उत्तर कोठे आहे ? अभ्यास सातत्यपूर्ण असावा , तो आनंदाने करावा एवढेच समजले, पण शेवटी प्रश्न राहतोच 'अभ्यास 'म्हणजे काय ?
  • Rationalist Rajendra Gadgil अभ्यास आनंदाने करावा हे ठीक पण तो नियमपूर्वक केला पाहिजे हा काही मापदंडक नाही ,प्रत्येकाची आपली पद्धत असते ,आभास झाला पाहिजे हेच फक्त महत्वाचे .
  • Leena Mehendale नियमपूर्वक नसेल तर त्याला अभ्यास नाही म्हणता येत असं मला वाटत. म्हणूनच अभ्यास आणि सराव हे पुष्कळ अंशी पर्यायवाचक आहेत. कार चालवतांना मला एवढा सराव असावा कि कार हातांनी व पायांनी चालवली पाहिजे --- मेंदूच्या आज्ञेसाठी न थांबता
  • Rationalist Rajendra Gadgil अभ्यास म्हणजे एखादी समस्या ,किंवा एखादी घटना ,का घाडते,कशी घडते ,तिचा कार्य कारण भाव काय , अशापद्धतीने ती जाणून घेणे म्हणजे अभ्यास होय .
  • Rationalist Rajendra Gadgil एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी ,किंवा एखादी गोष्ट पाठ होण्यासाठी सराव असावा लागतो जसे ड्रायव्हिंग ,कविता पाठ येणे इत्यादी ,काही एक पाठी व उत्तम स्मरणशक्ती वाले असतात ते अपवाद आहेत सरावाला .असो
  • Rationalist Rajendra Gadgil आपण सरावाला पर्यायी शब्द म्हणून आभास हा शब्द वापरत असाल तर मग ठीक .
  • Rationalist Rajendra Gadgil मी गणिताचा आभास करीत आहे ,असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा तो विषय समजावून घेण हा तिथे अर्थ अभिप्रेत असतो ,त्याची घोकंपट्टी करण् ,आणि तो पाठ करण् हा अर्थ अभिप्रेत नाही .
  • Rationalist Rajendra Gadgil पण मी पाढा पाठ करतो तेंव्हा तो नियमित पणे कर्ण हा एक भाग असुश्क्तो , तो नियमित केलाच पाहिजे असा अर्थ नाही .
  • Leena Mehendale Rationalist Rajendra Gadgil घोकंपट्टी नाही. मी रोज नवा धडा वाचला तरी रोज ( किंवा आठवड्यांतून एकदा पण नियमपूर्वक) धडा-वाचनाचा अभ्यास केला असंच म्हणावे लागेल. असो. इथे अभ्यास कशाला म्हणावे हा मुद्दा नसून एक आठवण मांडली आहे ज्यामधे एका सुविचारी व्यक्तिने मला एक नवा आयाम दाखवला ज्याने मला खूप फायदा झाला.
  • Patil Ketankumar · 6 mutual friends
    chala ata me anandane abhyas karnar..!!
  • Drt Chandrakant · Friends with Deva Zinjad and 26 others
    एक आजोबा बसलेले होते- निवृत्त शिक्षक. = seniority counts
  • Sandip Pawar · Friends with Mahesh Pawar and 1 other
    waah..!! bhartachya utkarshasathi yachi far garaj aahe,..!!
  • Ravindra Patil abhyas ha pratyek gostit asatoch,lahan motha ha bhedbhavach tyala manya nahi.
    July 31 at 8:47am via mobile · Unlike · 1
  • Manohar Ahire · Friends with Amar Habib and 4 others
    म्याडम,एक नम्र विनंती करू का? आपण प्रशासकीय सेवेत आघाडीच्या पदांवर काम केले आहे.पण अधिकारी कितीही मोठा असला तरी तो जनसामान्यांशी उत्तरदायी असतो,हे आपण आपल्या कार्यशैलीतून सिध्द केलेच आहे. आपण एखादे पुस्तक का लिहित नाही. अलीकडेच नाशिकला एक अनुभव आला.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक एक निवेदन देण्यासाठी गेले.कार्यकर्ता म्हणून मीही सोबत होतो. जिल्हाधिकारी नव्हते म्हणून निवासी उप-जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो. त्यांनी बसूनच निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळ बाहेर गेल्यावर मी मात्र त्यांना खडसाविले कि,उभे राहून निवेदन स्वीकारायचे होते. सारे बुजुर्ग होते अन त्यांच्या त्यागानेच आपणास ही खुर्ची मिळाली आहे...पण त्यांनी अतिशय उर्मट प्रतिउत्तर दिले.अश्यावेळी आपल्यासारख्या सुसंस्कारित अधिकारी वर्गाची फार उणीव भासते....aso.
  • Leena Mehendale Manohar Ahire -- आमचे एक दिवंगत कलीग रमेश कानडे यांनी सुप्रशासनावर खूप छान पुस्तक लिहिलें आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रशासनाची बखर छान आहे. माझीही आतापर्यंत दोन पुस्तके आली आहेत -- इथे विचाराना वाव आहे आणि समाज मनांतील बिंब।
  • Leena Mehendale शिवाय माझे ३ ब्लॉग आहेत -- राजकीय चिंतन, प्रशासनाकडे वळून बघताना आणि माझे नवे लेखन
  • Manohar Ahire · Friends with Amar Habib and 4 others
    वरील दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक कोण आहेत? मागवायला सुलभ होईल..dhanyavad.
  • Leena Mehendale समाज मनांतील बिंब -- Mauj, mumbai, इथे विचाराना वाव आहे -- Sanskriti prakashan pune
  • Manohar Ahire · Friends with Amar Habib and 4 others
    फार फार आभारी अह्हे मी आपला..
  • Anuradha Vartak · Friends with Deva Zinjad and 14 others
    खरच आहे अभ्यासात आनंद नसेल तर सर्व कठीण वाटू लागते
  • Rajendra Bondre खर आहे मँम कारण आपण आभ्यास घेतो म्हणजे आपल्या आपेक्षाच ओझ मुल निट वाहतात का नाही हेच पाहत असतो अस वाटत,आजोबांच म्हणण खर आहे... सुप्रभात.
    July 27 at 8:14am via mobile · Unlike · 1
  • Leena Mehendale Sunil Pathak --आता निवृत्त आहे तर शिक्षणक्षेत्रात काही करायला -- विशेषतः शिकवायला खूप आवडेल -- मी तुमच्या युनिव्हर्सिटीत ऊर्जा-बचत या विषयावर 12 लेक्चर्सचा एक प्रोटोकॉल पण तयार केला होता पण तो 3 लेक्चर्स नंतर थांबवावा लागला. पुन्हा पाहू असेच काहीतरी.
  • Sunil Pathak Madam Can you can you spare time and come again whenever possible and complete the remaining 9 lectures ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: