मराठीसाठी वेळ काढा --- मराठीतटंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्याधड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्याघरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाऊ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायचतुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.आमचा एक ग्रूप रत्नागिरी मधे सुरुवात करणार आहे. तुम्ही सहभागी होणार का?
Meena Trivedi, Deven Churi and 8 others like this.
- Leena Mehendale या उपक्रमाला सर्वांची साथ मिळो.
Subhash Chheda I can speak Marathi, read Marathi but can not write Marathi. Hope, with the help of this i shall be able to do it. Thanks Leenaji for this innovative thought process. We are with you....
Keshav Nandedkar While checking mails, I have seen all the photos. Barring few all have been seen by me herebefore. The key board will be very usefull to me, thanks. If I get some time,to practice Devnagari Script, I hope I will be able to send you mails in Marathi.
Ajit Satle आज सरकारी कार्यालयात बहुतेक ठिकाणी "ISM" नावाचे मराठी टंक लेखनाचे सोफ्टवेअर वापरले जाते. संगणक क्षेत्रात आज मराठी टंकलेखनासाठी अनेक सोफ्टवेअर बाजारात आले आहेत. मग ते "Akruti, Ileap, Shrilipi, Shivaji, Sudha Fonts आणि अजून काही...आता गुगल ने... हि मराठी टंक लेखनासाठी ऑनलाईन सुविधा आणली आहे. त्याची लिंकhttp://www.google.com/transliterate/marathi अशी आहे. यात मराठी मजकूर टंक लेखन करताना मराठी इंग्रजी मध्ये टाईप केल्यास मराठी अक्षरे उमटतात यासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड ची गरजच भासत नाही. गुगल ची मराठी टंक लेखनाची सुविधा सर्वांत सोपी आणि पटकन कळणारी आणि सोयीस्कर आहे या सुविधेचाही सर्वांनी लाभ घ्यावा. तुमच्या या मराठी उपक्रमास खूप खूप शुभेच्छा....!
Navin Kumar I found the google transliteration facility too easy. My first sentence is मैने पहली बार गूगल सुविधा का प्रयोग किया . यह तो बहुत हि सरळ है
Leena Mehendale अजित साटले व नवीन कुमार, गूगल-मराठी शिकणं सोपं आहे यांत शंका नाही, पण ते येण्यासाठी इंग्लिश आवश्यक आहे. इनस्क्रिप्ट पद्धत गूगलपेक्षाही सोप्पी आहे व इंग्रजी न येणारी मुलेमुली पटकन शिकू शकतात. शिवाय ज्यांना खूप पानं मराठीत लिहायची असतील त्यांना रोमन उच्चार वापरून ते करणं खूप कंटाळवाणं असतं. असो. मात्र थोड्या उपयोगासाठी इंग्रजी टायपिंगची सवय झालेल्यांना ते चालेल.
Leena Mehendale गूगल-मराठीची भिती अशी की त्यामुळे आपल्या लिप्या हरवत जाणार, कांहींना वाटतं तेच बरं आहे. म्हणूनच या ठिकाणी थबकून विचार करण्याची गरज आहे.
Leena Mehendale Some good practicing lessons are given at the end of this chapter. Pl use them.
http://anu-vigyan.blogspot.com/ 2009/03/7-7-8.html
similarly the link given by meghraj Patil above tells what you have to do for a one-time setting on your wundows
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1199
Leena Mehendale सरकारी कार्यालयातील मराठीचं कुठे अडतं या संबंधी हा लेख पहावा.
http://bhasha-hindi.blogspot.com/ 2010/05/ let-1-1-become-eleven.html
Prashant Bhardwaj Oh on that day you were talking about the Leap office. I used leap office in late 90ies.
Leena Mehendale yes then it could not be sent on internet. Now if u r using same INSCRIPT keyboard on microsoft word it can go on internet जैसे अभी
Navin Kumar गूगल वापरून मी प्रथमच अत्यंत सहजरीत्या मराठी मधे लिहून राहिलो आहे. कारण प्रत्येक शब्दाचे चार ते पांच पर्याय मिळतात. इंगरेजी भाषा चा थोड़ा ज्ञान आवश्यक आहे. आता महाराष्तात प्रथम वर्गातून इंगरेजी भाषा चा शिक्षण चालू झालेला अस्ल्यामुले बहुतांश लोकानां इंगरेजी भाषा ची माहिती असतेच. म्हणून माला तर असे वाटते की गूगल यन्त्र जास्त लोकप्रिय होऊ शकेल.
Navin Kumar लीना जी. आपली हि जी भीती आहे कि गुगळे यंत्र वापर करण्या मध्ये देवनागरी लिपी संपर्क कमी होत जाणार निराधार आहे असे मला वाटते. लिपी परिचय प्राथमिक व माध्यमिक स्तर पर्यंत बराच सुदृढ होऊन जातो. व्यावसाईक जीवना ची सुरुवात झाल्यानंतर टंकलेखन सुविधा नसल्यामुळे मराठी किंवा हिंदी पत्र कसे टाळता येतील असे प्रयत्न होतात. लिपी परिचय कायम राहतो कारण आपण हाताने पत्र बहुतांश देवनागरी मधेच लिहितो.
Kaushalam Trust T link here tells u how to proceed. But first u need a one-time setting to fix the font on ur comp. The method is given in the same article
http://bhasha-hindi.blogspot.com/ 2009/02/blog-post.html
Leena Mehendale for putting hindi, marathi or any Indian Language on your computer do this --
Start -> setting -> control panel -> region and languages
-> Here u get info that Eng (US) is your default setting.Use Drop
down menu to see if the option of Hindi is there.
If YES, click on it and then click on Apply and OK.
But if the Hindi option is NOT there , then go to languages and tick the box for complex languages, it
asks for windows XP CD. Because the file i386 of that CD will be
needed.
Once this setting is done INSCRIPT key board is far more easy than google transliteration.
Once we recommended to govt to make it compulsory for every seller of computers to load the Indian fonts from their i386 file before handing over the machine to custome as it costs them no money but just 1 minute of time. May be Consumer forum should take it up.
Vilas EkhandePatil आम्ही गेली ४ वर्ष मराठीत टंकलेखन करणारे कारागीर शोधतो आहोत. सापडत नाहीत. याहून दुसरी शोकांतिका नाही. बारा वर्षांपूर्वी मी स्वतः जाणीवपूर्वक मराठी टंकलेखन सुरु केलं. संपूर्ण दिवसभरात एक पान अशी सुरवात झाली. कार्यालयीन कामकाज मराठीतच करत गेलो. आता माझी नवी कादंबरी मी स्वतःच टाईप केलीय. श्रमाचे सार्थक झाले.
Leena Mehendale माझा हाच प्रयत्न आहे की इंग्रजी येत नाही म्हणून कम्प्यूटर नाही, म्हणून नवे तंत्रज्ञान नाही ही अवस्था शाळेच्या आठव्या इयत्तेच्या आसपास ड्रॉप आउट झालेल्या (ज्यांची संख्या 80 टक्के आहे) मुलीमुलांवर नको. त्यांनाही थेट मराठीतूनच आणि सोप्या पद्धतीने कम्प्यूटर वापरायला मिळावा आणि ते त्यांच्या रोजगाराचे साधन व्हावे. कादंबरीबाबत अभिनंदन. नांव कांय ।
Milind Ranade देवनागरी कळ पटाच्या या संपूर्ण महाभयानक प्रश्नावर माझे पूर्णतः वेगळे विचार आहेत हे मी या जागी केवळ नमूद करू इछितो.
लीना ताईंना याची पूर्ण माहिती आहे.
inscript या कळ पटाचे तर्क शास्त्र चुकीचे आहे.
हा कळ पट वापरण्यास सोयीचा अजिबात नाही.
गूगल इंग्रजी स्पेलिंग करून देवनागरी लिहिण्याची सोय हि सोय नसून आपल्या भाषेची आणि लिपीची अक्षम्य हेळसांड आहे आणि याच्या परिणामा मुळे आपली लिपी, भाषा आणि शेवटी संस्कृती नष्ट होणार आहे यात शंकाच नाही.
पहिल्या प्रथम आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यावे या फालतू कारणा साठी आपण आपल्या मराठी शाळा नष्ट केल्या आणि त्या जागी कॅथोलिक शाळा आणून बसवल्या. या शाळात वाढलेल्या पिढीला आता आपल्या देश आणि संस्कृतीशी काहीही घेणा देणा उरलेला नाही. या मुलांचा आपल्या मातीशी काहीही संबंध नाही. या मुलांनी इंग्रजी शिकून इंग्रजी भाषेत काय झेंडे रोवले ते दिसतेच आहे. आपल्या साहित्य, कला, संगीत याची कधीही भरून निघणार नाही अशी नासाडी या काथोलिक शाळांनी केली आहे. हि पिढी ना भारतीय आहे, ना पाश्चात्य. हि पिढी छ्क्यांची आहे. म्हणूनच लाखो शेतकरी आत्महत्या करीत असतांना महाराष्ट्र मेलेल्या मुडद्या प्रमाणे थंड आहे.
अमेरिका हा मुख्यतः ख्रिस्चन देश आहे. पण इथले ख्रिश्चन आई वडील आपल्या मुलाना शाळेत पाठवतांना convent शाळात पाठवत नाहीत. सरकारी शाळात पाठवतात.
हा धर्माचा मुद्दा नाही. संस्कृतीचा आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.
माझा भाचा मुंबईच्या सेंट झेवियार मध्ये शिकला. भारतीय संस्कृतीचा स सुद्द्धा या मुलांना शाळेत शिकवला गेला नाही. रंग पंचमीला ही मुले खूप रंगायची. दुसरया दिवशी शाळेत गेल्यावर यांना वर्गाबाहेर उभे केले जायचे. कारण चेहर्या वरचा सगळा रंग पुसला गेला नाही म्हणून.
भारतीय संकृतीबद्दल पराकोटीची घृणा असलेली ही माणसे आणि त्यांच्या संस्था. आणि आपण यांच्या हातात आपली मुले दिली! संस्कार मिळावा म्हणून!
आपल्या अक्लेचीही तारीफ करावी तेवढी थोडीच आहे!
Leena Mehendale Leena Mehendale inscript या कळ पटाचे तर्क शास्त्र अजिबात चुकीचे नाही, कदाचित ते खूप परफेक्ट नसेल. अगदी किरण फॉण्टच्या भावेंनाही हे पटले आहे.पण तुम्ही गूगललाही वाईट म्हणता जी इतरांना सोइची वाटते. मग तुम्हांला पर्याय काय. भावे मान्य करतात की inscript मधले कांही किरकोल दोष काढले तर ती पद्धत उत्तम आहे. तिचा मोठा गुण म्हणजे सर्व भारतीय लिप्यांची एकात्मता तिने टिकून राहील, ते आज युनीकोड घालवत आहे आणि आपण आपल्या राजपूत बाण्याला जागून त्याचे समर्थन करीत आहोत.
आपल्यासमोर दोन वाद आहेत.एक -- इतर सॉफ्टवेअरचे की-बोर्ड का inscript का गूगल असा वाद. दुसरा inscript ची युनीकोड पद्धत का लीप ऑफिस पद्धत --मात्र त्याचे उत्तर फक्त राजकीय पातलीवर भारत सरकारने मुद्दा लावून धरला तरच निळेल.
Milind Ranade पहिल्या प्रथम हा प्रश्न आहे हे मान्य करावे लागेल. प्रश्न नसता तर आज inscript लोकप्रिय करण्या साठी आपल्या सारख्यांना जो जीवाचा आटापिटा करावा लागत आहे, आणि तो करून ही हा कळ पट देवनागरी वापरणारे स्वीकारत नाहीयेत यातच सर्व काही आले.
फेसबुक सारखी गोष्ट जी दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती, ती आज इतकी वणव्यासारखी सर्वत्र का पसरत आहे हे अभ्यासावे लागेल.
जी गोष्ट लोकांना पटकन समजते, ती लोक आत्मसात करायला जरा ही वेळ लावत नाहीत. त्याच प्रमाणे लोक ती गोष्ट आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना तातडीने सांगतात आणि ती गोष्ट तापाच्या साथी सारखी पसरते.
इंस्क्रीप्त च्या बाबतीत हे होत नाहीये हे स्पष्ट दिसत नाहीये का?
इंस्क्रीप्त मध्ये अत्यंत गंभीर चूक आहे. देवनागरी लिपी चे दृश्य स्वरूप यात ध्यानातच घेतले गेलेले नाही.
आपण भाषा आणि लिपी कशी शिकतो याचाच हा कळ पट तयार करतांना विचार केला गेला आहे. पण एकदा लिपी शिकल्यानंतर आपण ती कश्या स्वरूपात वापरतो त्याचा कुठलाही मुलभूत विचार इंस्क्रीप्त मध्ये केलेला नाही.
गुगल transliteration ही तर लिपी आणि भाषा सगळ्याचीच विल्हेवाट आहे हे तर तुम्हालाही मान्य आहे.
Leena Mehendale "आपल्या सारख्यांना जो जीवाचा आटापिटा करावा लागत आहे, आणि तो करून ही हा कळ पट देवनागरी वापरणारे स्वीकारत नाहीयेत" ... याचे कारण भारत सरकारलाच ते नको असून त्यांना गूगल ट्रान्सक्रिप्ट रूढ करून भारतीय लिप्या संपवायच्या आहेत आणि सीडॅकलाही देश, भाषा, लिप्या यांचे देणे घेणे नसून फक्त अहेकार आणि पैसा एवढाच जपायचा आहे.
Leena Mehendale कृपया हा पत्रव्यहार पहावा. -- http://naz-hai-hind-par.blogspot.c om/2010/08/ my-rti-desk.html
Leena Mehendale पण ती गूगलपेक्षा सोपी आहे का असे काहींना वाटते. माझे उत्तर -- हो गूगल पे क्षा सोपी -- पण ते पटायला कदाचित वेळ लागेल. तोपर्यंत खूप उशीर झाला नसावा हीच सदिच्छा
Shripad Lele नमस्कार,
बराहा इनस्क्रीप्ट पद्धती फार सोपी आहे, तरीही देवनागरी लेखनासाठीच नव्हे तर
देवनागरी लिपी व भारतीय भाषांसाठी DOS/windows पद्धती निर्माण होऊन सहज सुलभ
वापरात यायला हवी. एवढे भारतीय, संगणक क्षेत्रात कार्यरत असूनही अरेबीक, चायनीज
च्या आधी भारतीय भाषासाठी विषेश प्रयत्न झालेले दिसत नाहीत, आपण संगणक उपयोग
सर्वदूर व्हावा म्हणून करीत असलेल्या प्रयत्नाना शुभेच्छा!
Leena Mehendale बरहा लिहिण्यासाठी मेंदूत इंग्रजी स्पंलिंग पक्के बसावे लागते. ते आठवीला शाळा सोडलेल्या मुलांना कसे येणार. इनस्क्रिप्ट साठी इंग्रजी स्पेविंग यावे लागत नाही. सुजय देखील आधी बरहा हेच वापरत होता, पण आता इनस्क्रिप्टचा जास्त सोपेपणा व हा मुद्दा हे दोन्ही त्याला पटले आहेत.
स्वाती ठकार मी इन स्क्रिप्टच वापरते .माझे सर्व प्रादेशिक भाषातील काम आय- लिप मध्ये करते .अर्थात फेसबुक वर गुगल इंडिक ट्रान्सलिटरेट वापरावे लागते .☺☺☺
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें