January 31, 2011 खरे दोषी आहेत तरी कोण ? -- गोगडांचा लेख
शनिवार, 4 अगस्त 2012
सदस्यता लें
संदेश (Atom)
It is reported that total internet pages in all Indian languages put together are very minimal as compared to other languages. The keyboard layout developed earlier by C-DAC but operationalised by lenux on unicode, also known as the INSCRIPT type offers quickly usable approach. I have used it here to create some pages in Gujrati.
भेसळीचा फायदा(च फायदा) राजकीय पक्षांना.
मग विचार आणि कृती कोणी करावी लागेल हे आपोआप ठरते.
गॉडफादर३ मधल्या या वाक्य ऐकली की, आपल्याकडील मनमाडसारख्या घटनांचा अर्थ नव्यानं लक्षात येत जातो.
सोनवणे, मेहंदळे अपवाद असतील पण भ्रष्टाचाराची पाळेमुळे ह्या 'सिस्टम' मध्येच आहेत, राजकारणी निवडणुकीत पराभूत होऊ शकतो पण ही मंडळी रिटायर झाल्याशिवाय जात नाहीत, रिटायर झाल्यावर मोठे उद्योगसमूह आहेतच!
खरोखरच आपण यशवंत सोनवने यांच्या बद्दल दुखः वाटुन घयाच का?
आपण एरवी नाग-साप दिसले कि काठी हातात घेतो
पण नाग पंचमी आली कि पूजा करतो पाया पडतो.
त्यामुळे हे सर्व दोन-चार दिवसाचं चर्चेचं गुराळ आहे. बस...
या प्रतिक्रियेची दुसरी बाजू तुम्हाला कधीतरी उमगेल ही अपेक्षा. प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळत असतांना त्यातील चांगले अधिकारी लोकाना बरोबर घेऊन कृती कार्यक्रम ठरवू शकले नाहीत तर ती जास्त दुर्दैवी गोष्ट ठरेल, पण तशी प्रोसेस आपल्याकडे अजून सुरू नाही. जसे वानरांनी राम, लक्ष्मण, सीता यांचा चांगुलपणा माहीत असूनही त्यांच्या (तुलनेने कमी) चुकेवरच बोट ठेवले पण रावणाचा विचारही त्यांना सुचला नाही तसेच आपले होणार का ? खूप वर्षांपूर्वी याच विषयावरील माझे चिंतन "जा जरा चोकटीपलीकडे" या लेखांत आहेhttp://prashasakeeylekh.blogspot.com/2007/03/look-beyond-your-frame.html
चंद्रकांत गोगड यांच्या लेखावर बरीच चांगली चर्चा होतेय, प्रत्येकाची आपापली मते आहेत, शंकाही आहेत...
भ्रष्टाचार थांबला तर पाहिजेच... मला वाटतं, पण तो काही आकाशवाणी होऊन थांबणार नाही... कुणीही सनदी अधिकारी तो थांबवू शकणार नाही.. तो फक्त त्याच्या पातळीवर प्रयत्न करतील,
काही सनदी अधिकारी मला माहिती आहेत, (मी तुमच्याविषयी फक्त ऐकलेलं आहे - म्हणजे प्रशासकीय कारकीर्दीविषयी मला खरंच ठाऊक नाही, तुम्ही नाशिकला विभागीय आयुक्त असताना पाठवलेल्या अहवालाविषयी गोगड यांच्या लेखातूनच समजलं. तुम्ही ऑफिसमध्ये बऱ्याचदा आल्याचं कळलं, पण भेटता आलं नाही... )
तुमच्याशिवाय सध्या धडाकेबाज सेवेसाठी चर्चेत असलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, शेवटच्या माहितीनुसार अकोला झेडपीला सीईओ असलेले तुकाराम मुंडे (यांनी फक्त चार दिवसात बार्शी अतिक्रमण मुक्त केली होती, बार्शी माझं गाव आहे, त्याकाळात त्यांच्याविषयी दंतकथा तयार झाल्या होत्या) अजून काही असतील...यांनी लोकांना सोबत घेऊन पुढाकार घ्यायला हवा.
आज इथे कॉमेन्ट लिहिणाऱ्या प्रत्येकांने कुठल्याही सरकारी कार्यालयात कोणालाही कितीही महत्वाचं काम असलं तरी लाच किंवा चहापाण्यासाठी कारकुनाला पैसे देणारच नाही, वेळ लागला तरी चालेल, अशी ठाम भूमिका घेतली तरी बराच फरक पडेल...
कसल्याही कामासाठी सरकारी बाबू पैसे मिळणं (किमान चहापाण्यासाठी तरी) हा आपला जन्मसिद्ध हक्क मानतात, आमच्याकडे सरकारी नोकरी लागली की सरकारचा जावई झाला असं म्हणतात.
खरं तर एक वेगळा मुद्दा, या निमित्ताने सुचलेला : सरकारने अनेक गोष्टी ज्या पूर्णपणे मोफत मिळायला हव्यात, त्या सरकारी बाबूंमुळे मोफत मिळत नाहीत, अशांसाठी प्रशासकीय कार्यालयात "सेतू" ची दुकानदारी सुरू केली, पण त्यातही ठेकेदारी आली, पण तिथेही कामे होत नाहीत म्हणून मग लोक थेट संबंधित कारकुनाकडे जाऊन आपलं काम करवून घेतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या सेतूचे स्वतःचे वेगवेगळे असे नियम आहेत, आता सरकारनेच दुकानदारी सुरू केलीय, तर आम्ही का नको, असे सरकारी कारकून म्हणू लागलेत.
3. आपण जी लिंक वाचायला दिलीत त्यावरून माझ्या प्रतिक्रियेची 'दुसरी' बाजू मला आकलली नाही उलटे ह्या 'सिस्टम' मधील अंतरंग नको तेवढे कळले !
4. वानरांनी रावणा बद्दल चर्चा केली नसेल पण त्याला मारायला स्वतः बलिदान देऊन प्रभू रामचंद्रास मदत केली ह्याचा काय अर्थ लावायचा ?
5. 'सिस्टम' मध्ये 'तुलनेने कमी चुका' नकोतच शिवाय त्याचे समर्थनही नकोच नको कारण सर्वसामान्य लोकांच्या टॅक्स मधून 'सिस्टम' मधील लोकांचा पगार व इतर मानमरातब होतो, भले ते बँकेतून उचलतही नसतील !